
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०९० वा दिवस
कर्मयोग म्हणजे - प्रत्यक्ष मृत्यू समोर असताही, ब्रही न काढता, न कचरता, निमूटपणे कुणालाही साहाय्य करणे. लाखो वेळा जरी लोकांनी तुम्हाला ठकविले, फसविले तरीसुद्धा तोंडावाटे चकार शब्द देखील काढू नका, आणि आपण म्हणजे काही मोठे चांगले काम करीत आहोत अशाही विचाराला मनात थारा देऊ नका. गरिबांना तुम्ही जे दान द्याल त्याविषयी कधीही बहादुरी, हुशारकी मिरवू नका, किंवा त्यांच्याकडून चुकून कधी कृतज्ञतेचीही अपेक्षा बाळगू नका; तर उलट त्यांनी तुम्हाला दया दाखविण्याची संधी दिली याबद्दल तुम्हीच त्यांच्याप्रती कृतज्ञ व्हा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २४ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५
★ उत्पत्ती एकादशी 🚩🚩🚩🚩
★ १८७५ आदिवासी जननायक, झारखंड मधिल स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्मदिन.
★१९४९ महात्मा गांधीजींच्या हत्याकांडातील आरोपी नथुराम गोडसे व आपटे यांना फाशी दिली गेली
★ १९८२ भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे अनुयायी, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा स्मृतिदिन.
★ राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
