
नांदगाव ( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडीअम स्कूल येथे आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व लहान मुलांविषयी प्रचंड प्रेमआहुलकी असणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली तर इतर उपस्थित सर्व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थीनी कु. रोहित पाटील,देविदास कोळपे, देवांशी केकाण ,स्वरा जाधव इत्यादी यांनी आपले मनोगत व्यक्त केले़अनेक नाट्य,नृत्य, वि.मैदानी खेळ बालदिन निमित्ताने घेण्यात आले. शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुप्रिया शिंदे भाषणात यांनी सर्वांना बालदिन साजरा करण्याचे महत्त्व, उद्देश हे देखील स्पष्ट केले.नांदगाव तालुका संचालक माननीय श्री. अमितभाऊ बोरसे साहेबांनी विदयार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ८वी विदयार्थ्यीनी शरण्या पवार व सिद्धािका निर्भवणे आहे यांनी केले. यावेळी आदर्शचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
