

नांदगाव (प्रतिनिधी) – संवेदनशील लेखिका श्रीमती नूतन अशोक मळणकर लिखित “जीवन सुंदर आहे!” या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच म.सा.प. शाखा नांदगावचे अध्यक्ष, गणतंत्र न्यूजचे संपादक प्रा. सुरेश नारायणे यांच्या हस्ते त्यांच्या “हर्षनाद” निवासस्थानी घरगुती पद्धतीने संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत सौ. ऋतुजा शिंदे, सौ. अलका शिंदे, हर्षद नारायणे, सौ. मितल गांधी, निनाद नारायणे, तसेच विनोद सुरेशराव कामळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कामळे यांनी केले.प्रकाशनानंतर बोलताना प्रा. सुरेश नारायणे यांनी सांगितले की,> “लेखिका नूतन मळणकर यांचे ‘जीवन सुंदर आहे!’ हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी असून, मानवी मनाला सकारात्मकतेचा नवा दृष्टिकोन देणारे आहे. यापुढेही त्यांनी अधिक समाजप्रबोधनपर साहित्यनिर्मित करावी,

अशा शुभेच्छा मी देतो.”लेखिका नूतन मळणकर यांनी मनोगतातून पुस्तक लेखनासाठी प्रेरणा व साथ देणाऱ्या सर्वांचा मनःपूर्वक आभार मानले.घरगुती वातावरणात पार पडलेला हा प्रकाशन सोहळा अत्यंत आत्मीयतेच्या आणि साहित्यिकतेच्या भावनेने साजरा झाला.
