
ओझर: ( वार्ताहर , नंदकुमार न्याहारकर)मविप्र समाज संचलित ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाच्या मुलींचा संघ टेनिकॉइट स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर उपविजेता ठरला. नाशिक येथे झालेल्या अंडर सेव्हन्टीन मुलींच्या जिल्हास्तरीय टेनीकॉइट स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या भाग्यश्री हनुमंत जोंधळे, वेदिका पंडित चौधरी, सिद्धी विजय चौधरी, नेहा अशोक तौर या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला होता. या संघाने फायनलमध्ये प्रवेश करून विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. सर्व खेळाडूंचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड, उज्वला जाधव, मनोरमा सोमवंशी आदींचे मार्गदर्शन लाभले.
