
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी आपल्या मनोगतात महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेला रामायण हा पवित्र ग्रंथ प्रेम, त्याग, तपस्या आणि कीर्ती या मूल्यांवर भर देतो. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याची वाटचाल करावी असे आवाहन केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक यांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
