
बोलठाण ( प्रतिनिधी). लाडक्या विघ्नहर्ताचे आगमन होत असल्याने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विराजमान करण्यासाठी गणेश भक्तांची तयारी आली असून सजावटीचे साहित्य व गणेशमूर्तींची खरेदी करण्यासाठी बोलठाण बाजारपेठेत दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडी गर्दी कमी दिसून आली. दरवर्षीपेक्षा यावर्षी धंद्यावर मंदी आल्याचे विक्रेत्यांनी बोलताना सांगितले.

नांदगाव शहर व नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात लहान – मोठी ९१ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. नांदगाव शहरात 15 तर ग्रामीण भागात 33, एक गाव गणपती 43 गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्रींच्या स्वागतासाठी नांदगाव शहर सज्ज झाले असून नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसर सज्ज झाला असून प्रमुख रस्त्यावर स्वागतासाठी कमानी लावण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरात बोलठाण येथे सजावटीचे साहित्याच्या खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसभर श्री प्रतिष्ठापना मंडपाचे सुशिक्षित करण्यात व्यस्त होते. विविध रूपातील गणेश मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. घरगुती मूर्ती पासून ते मंडळांना लागणाऱ्या सर्व आकाराच्याय गणरायांच्या मूर्ती नांदगाव शहरात आणि बोलठाण येथे उपलब्ध करून देण्यात आल्याने गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी दिसून आली.

मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेश मूर्तींची विक्री म्हणावी तशी झाली नसल्याचे विक्रेत्यांनी बोलताना सांगितले
