
नांदगाव ( प्रतिनिधी, सोमनाथ घोंगाणे) नांदगाव येवला रोडवर मल्हारवाडी शिवारात वीज पडून एक मेंढी व तीन बकऱ्या मृत्युमुखी याबाबत वृत असे की आज दुपारच्या सुमारास नांदगाव शहराजवळील मल्हारवाडी डोंगरावर कांदा व्यापारी भुषण धूत यांच्या कांदा वखारी समोर ज्ञानेश्वर म्हाळू शिंदे व त्याचा मुलगा हे मेंढ्या चारत असताना अचानक जोरात आवाज करीत वीज पडून एक मेंढी व ३ बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या तसेच काही बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत .घटनास्थळी मल्हारवाडी गावच्या सरपंच अश्विनी मुकूंदा खैरनार यांनी त्वरित धाव घेऊन घटना स्थळावरून पशूवैद्यकीय डॉक्टर रोहीत कुऱ्हे यांना फोन लावून त्वरीत माहीती दिली डॉ रोहीत कुऱ्हे व नानासाहेब काकळीज यांनी त्वरीत येवून जखमी मेढयांना औषधोउपचार केले व मयत मेढयांचे पोस्टमार्टम केले . तसेच तहसिल प्रशासनाला फोन लावून तलाठी यांना घटनेची माहीती दिली. .

सदर मेढपाळ ज्ञानेश्वर शिंदे याचे सुमारे एक लाख रुपये नुकसान झाले असून प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरपंच अश्विनी मुकुंदा खैरणार या प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . सदर घटनेची माहीती सामाजीक कार्यकर्ते मुंकूंदा खैरणार यांनी आ. सुहास कांदे यांना दिली . तसेच सदर मेढंपाळाला सरकारी मदत मिळवून देण्याची विनंती केली.
