
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्राचार्य पी. एन. पवार यांच्या हस्ते विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे समन्वयक निंबाजी शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील होते. समवेत पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, रोडूआण्णा पाटील वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

प्रसंगी क्रीडाशिक्षक ललित निकम यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांकडून सामूहिकपणे कवायती करुन घेतल्यात. यावेळी ध्वजगीत राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधानाची प्रास्ताविका, प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रास्ताविक नरेंद्र अहिरे यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे ए. एम. साळुंखे यांनी केले.
