
कुबेर(प्रतिनिधी):- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी रंगनाथ सदाशिव उगले यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी श्री. उगले हे मराठा हायस्कूल नाशिक या शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. उगले हे इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक आहे. विद्यालयाचे उपशिक्षक दिंगबर जाधव यांच्या हस्ते उगले यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना श्री. उगले म्हणाले की,मी विद्यार्थी दैवत मानून कामकाज करणार आहे.विद्यार्थ्यांच्या शिस्त व गुणवत्ता याकडे लक्ष देईल . विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला . विद्यार्थ्यांनी वाचन- लेखनाकडे जास्तीत जास्त लक्ष दयावे असे आवाहन उगले यांनी केले. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी केले. यावेळी सोमनाथ गिरी, राजेंद्र गांगुर्डे,सोमनाथ पगार, रामदास वारुंगसे , रेवणनाथ कांगणे,किशोर शिंदे,रवि गोजरे आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.त्यांच्या नियुक्तीचे मविप्र संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत,शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने,पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे यांनी केले आहे.

