
सिन्नर (प्रतिनिधी) ३४६ वा शिवपदस्पर्श दिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महामित्र दत्ता वायचळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज दि. २२. नोव्हेंबर १६७९ रोजी जालना येथून स्वारी करून परतताना मोगली आक्रमणामुळे महाराज मोठ्या शिताफीने पट्टा किल्ल्यावर आले. महाराजांनी पट्टा किल्ला या गडावर जवळ जवळ १५ ते २० दिवस विश्रांती घेतली होती म्हणून या गडाला विश्रामगड असे संबोधले जाऊ लागले आहे.छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गेल्या ११ वर्षापासून हा दिवस एक प्रेरणास्रोत व शिव पदस्पर्श दिन म्हणून महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड साजरा करत आहे असे ते म्हणाले.
यावेळी शिवप्रेमींनी हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय आदि घोषणा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व आभार मनोज माळी यांनी मानले
यावेळी आभिवादन करण्यासाठी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, प्रकाश माळी, मनोज माळी, सोमनाथ लोहारकर, गणपत काळे, राजेंद्र देशमुख, धनंजय परदेशी, राजेंद्र सातपुते आदि उपस्थित होते.
